२०१९ सालाचा पूर्वार्ध संपला. या कालावधीतील राजकीय तापमान निवडणुकांमुळे खूपच वाढले होते. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. आणि प्रचार सभांचा धुरळा झुडत होता; मतमोजणी होथून भारताच्या केंद्रस्थानी भारतीय जनता पार्टीचे सरकार ओकदाचे सत्तेवर आले. राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबरच त्यांचे कार्यकर्ते आणि आपण सामान्य जनताही त्या वातावरणात गुंतून पडलो होतो. त्यामुळे अिकडे हवामानात झुठलेल्या प्रखर झुष्णतेच्या लाटा सरकारकडून आणि ग्रामीण व्यवस्थेकडूनही काही काळ दुर्लक्षितच झाल्या होत्या.

मे महिन्याच्या तिसऱ्या चौथ्या आठवड्यानंतर देशभरात सर्वत्र झुष्णतेच्या वाढत्या लाटा सर्वांना जाणवल्या आहेत. गेल्या साधारण पाच-सात वर्षांत झुष्णतेचा पारा वाढत चालल्याचे जाणवते आहे. पश्चिम महाराष्ट्रात तीन-चार दशकांपूर्वी ३८-३९ अंश अितका अन्हाळा सहसा ओलांडत नसे. नागपूर आणि वन्हाड प्रांतात ४०-४२ अंश तापमान कसे काय सहन होत असेल असे त्या काळात वाटायचे. चालू वर्षी हा भुच्चांक पश्चिम महाराष्ट्रानेच ओलांडला आणि विदर्भात तर तापमान ५० अंशांकडे झेपावत होते. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यानंतर, चारा-पाण्याची टंचाी पुढे जाणवणार अशी चिन्हे दिसत होती. शासनाकडून जलसंधारणाची कामे धडाक्याने हाती घेतली गेली. त्यांचा थोडा फार अनुकूल परिणाम झाला.
परंतु शेतीच्या क्षेत्रामधील आणि नागरी वस्तीमधील पाण्याचा वापर अितक्या थराला गेला आहे की, जलसंधारणाचे कितीही प्रयोग आणि प्रयत्न केले तरीही ते अपुरेच पडत जातील! याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या समाजात जलसाक्षरता आलेलीच नाही. पाणी कसे वापरावे याची शिकवण जाणत्या बाळापासून दिली गेली पाहिजे. पाण्याचा वापर शहरी भागात दरदिवशी वाढतच चालला आहे. माणसाच्या गरजेसाठी ओकदा-दोनदा वापरलेले पाणी शुद्ध करून ते शेतीक्षेत्राला दिले जावे अशी गरज आहे. शेतीला पाणी हवे, आणखी हवे, भरपूर हवे... या प्रकारची अधाशी वृत्ती शेतकऱ्यांच्यात निर्माण झाली आहे. पिकासाठी गरजेनुसार पाणी मिळायला हवे, याबद्दल वादच नाही; पण गरजेअितकेच ते वापरणे याची जास्त गरज आहे.
विटा, कडेगाव, खानापूर, आटपाडी हा सांगली जिल्ह्याचा श्रुत्तर भाग आहे. सह्याद्रीच्या सुतार भागावर असल्यामुळे तो मुख्यतः माळरानाचा आहे. पाच-पंचवीस वर्षांपूर्वी तिथे कोरडवाहू शेती होती. मूळच्या दुष्काळी म्हणविल्या जाणाऱ्या या भागात टेंभू योजनेचे पाणी फिरू लागले. त्यानंतर हा भाग आता झुन्हाळ्यातसुद्धा हिरवागार दिसू लागला आहे. जमिनीला पाणी मिळू लागताच बहुतांशी सर्वच शेतकऱ्यांनी भूस-शेती सुरू केली. त्या शेतीलाही कमीत कमी पाणी, सेंद्रिय खते, अॅब्झॉर्बर यांसारख्या नवीन तंत्रांचा वापर, शक्यतो ठिबक सिंचन, शेततळ्यांची निर्मिती, कडक अन्हाळ्यात जमिनीला आच्छादन करणे अशा झुपायांकडे आपले शेतकरी अजूनही जाणीवपूर्वक लक्ष देत नाहीत. मग या योजनांचे पाणी बांधाजवळून वाहू लागले की, आपापल्या शेतीभातीतून तलाव भरल्याप्रमाणे पाणी पाजले जाते. तलावतळी ग्रुपसून शेतीला पाणी सोडले जाते. तलावातील पाणी संपले की पुन्हा 'आणखी आणखी पाणी सोडा' म्हणून अधिकाऱ्यांवर आणि पुढाऱ्यांवर दबाव आणला जातो, आणि दुसरीकडे पाटकऱ्यांचे पाय धरण्याची वेळ येते.
ही परिस्थिती ताकारी, आरफळ, मिरज, म्हैशाळ, टेंभू या अपसा सिंचन क्षेत्रांत, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात आणि देशभरात सर्वत्र दिसत आहे. पाणी म्हणजे जीवन हे तर सर्वमान्य आहे, ते बहुमोल आहे आणि मर्यादित आहे. पाणी नसेल तर शेती क्षेत्र व्यर्थ आहे. हे सारे तत्वज्ञान शेतकऱ्यांना माहिती आहे पण आचरणातील जागरूकता अभावानेच दिसते. आजच्या पद्धतीनुसार शासनाने सुरापोटी प्रयत्न करून पाणी झुपलब्ध करून द्यावे, आणि भूमिपुत्रांनी मात्र ते पाणी नुसते अपसतच राहिले तर अती मोठ्या दुष्काळाला तोंड द्यावे लागेल अशी साधार भीती वाटते आहे. तशी भीषण वेळ आली तर आपण माणसे आणि पशुधन यांचे काय होील? याची कल्पनाही अंगावर काटा आणते.
अशी परिस्थिती येऊ नये म्हणून जलसंधारण आणि संवर्धन हा विषय निदान शेतकऱ्यांनी तरी आजपासून नव्हे, आत्तापासूनच मनावर घेतला पाहिजे. पिकाला जेमतेम गरजेअितकेच पाणी देण्याबरोबरच शेताशेतांतून, पलाण-बांधांतून, पडीक जागांमधून वृक्ष लागवडीची मोहीम शेतकऱ्यांनी हाती घेतली पाहिजे. जमिनीचा अिच आणि अिच झाडांनी आच्छादून गेला पाहिजे. यासाठी या मोसमात मोहीम हाती घेश्रूया. पुढची दोन-तीन वर्षे त्या वृक्ष लागवडीची निगराणी केली तर, कित्येक वर्षे आपल्या शेतीमधील सेंद्रिय खताची, आच्छादनासाठी पाला-पाचोळ्याची, आणि जमिनीत पाणी खोलवर मुरविण्याची कामगिरी ही वनसंपदा करणार आहे. हे जाणून घेऊन काम केले पाहिजे. वृक्षारोपणाचे काम म्हणजे वनविभागाने किंवा कुठल्यातरी शासकीय प्रचाराने करण्याचे काम नव्हे. प्रत्येक शेतकऱ्याने आणि त्याच्या प्रत्येक कुटुंब सदस्याने झाडे लावण्याची मोहीम सुरू केली पाहिजे. कोणती झाडे कुठे लावावीत या विषयीची माहिती याच अंकात दिली आहे, ती अपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.