Aerial view of flooded agricultural fields showing standing water and impacted crops on farmland illustrating how to protect crops from floods

'बचेंगे, तो और भी लढेंगे!'

गेल्या एक-दीड महिन्यात संपूर्ण देशभर 'पाऊस' एवढा अकच विषय कोसळत होता. जगाच्या दृष्टीने काश्मीर किंवा चंद्रयान हे विषय महत्वाचे असतीलही, परंतु आपल्या सामान्य शेतकरी जीवनात पावसाइतके महत्वाचे दुसरे काहीच नाही. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात नद्यांच्या पुराने शब्दशः धुमाकूळ घातला. वास्तविक महाराष्ट्रात साधारण जूनच्या मध्यापासून सप्टेंबरच्या महिन्यापर्यंत विखुरलेला पावसाळा असतो. नंतरच्या उत्तर हस्ताचे पाऊस हे रब्बी मोसमासाठी उपयोगी असतात त्याला वळीव पाऊस किंवा हल्लीच्या भाषेत परतीचा मान्सून म्हणतात. म्हणजे सुमारे चार महिने कधी धुवाधार वृष्टी तर कधी जाता-येताच्या वर्षासरी असा पाऊस आपल्याला ठाऊक आहे. परंतु परवाच्या जुलै-ऑगस्टच्या दरम्यान वर्षभराचा पासूस आठ-दहा दिवसांतच पडून गेला. सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचे संकट होतेच परंतु पश्चिम किनारपट्टीला पावसाने इतके झोडपले की, भूमीची धुलाीच झाली.

या सगळ्यामुळे व्यवसायिक, उद्योजक आणि मानवी वस्ती या सर्वत्रांचे नुकसान झालेच आहे; पण आपल्या शेतीचेही महाभीषण नुकसान सोसावे लागणार आहे. जनावरे, घरे-छपरे, अवजारे हे सारे डोळ्यादेखत पाण्यात गेले. आता घरांची पुनर्बाधणी, जनावरे या सर्वांसाठी नवे भांडवल शेती धंद्याला घातले पाहिजे. यातून सावरून पुन्हा उभे राहिलेच पाहिजे, त्याला पर्यायच नाही पण त्यात बराचसा काळ खर्ची पडणार आहे. विस्कटलेली घडी परत बसविण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली पाहिजे.

हे अती पावसाचे संकट एकीकडे तर दुसरीकडे पूर्व भागात आणि मराठवाड्यात भीषण दुष्काळी स्थिती उभी राहिली आहे. चाराछावण्या व पाण्याचे टँकर यांतून तिथल्या शेतकऱ्यांची अजूनही सुटका नाही. विना पेऱ्याची शेती भकास भुजाड पडली आहे. गणपती विसर्जनासाठीसुद्धा पुरेसे पाणी नसल्यामुळे एकेका गावातून सर्व घरांचे गणपती ओकाच वाहनातून दूर नेण्याची वेळ, वृत्तपत्रातून समजू लागली आहे. ओकीकडे ही भुजाड भीषणता आणि दुसरीकडे महापुराची भीषणता अशा दुहेरी चक्रात आपला शेतकरी अडकला आहे.

२०१९ साल संपत आले. सरकार म्हणते की २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे श्रुत्पन्न दुप्पट करणार. मोठेच प्रश्नचिन्ह आहे. सरकारच्या आश्वासनांची काळजी घ्यायला ते समर्थ असेलही परंतु आपले शेतकरी जीवन अशा भीषणतेने डगमगून चालणार नाही. चारा छावण्या, कर्जमाफी, बियाण्यांचा पुरवठा, कृत्रिम पावसाचे प्रयोग हे अपाय फार मर्यादित आहेत. सर्व बाजूंनी होणारी कोंडी फोडण्यासाठी सामान्य शेतकरीच काहीतरी करू शकेल आणि ते त्याने केलेच पाहिजे. अद्यापि निश्चित दिशा कोणालाच सापडत नाही, अशी आजची स्थिती आहे. त्यातच येते दोन-तीन महिने महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत शासन आणि प्रशासन गुंतून पडेल. त्यामुळे या सगळ्या आव्हानांची काळजी आपल्यालाच वाहिली पाहिजे.

या साऱ्या वास्तवाचे भान ठेवून हिंमत न हरता 'हेही दिवस जातील' अशी उमेद बाळगली पाहिजे. निसर्गाचा हा असमतोल होण्याला रासायनिक शेतीपद्धती हाही घटक कारणीभूत आहे. हे लक्षात घेऊन त्या पद्धतीपासून मुक्त होऊन निसर्गाशी जवळीक साधणारी सेंद्रिय शेती हाच उत्तम अपाय ठरणार. तो आचरून पुढील काळ अधिक सुखाचा व श्रुत्कर्षाचा येईल अशी कामना बाळगूया. 

Back to blog