राजाने राजासारखे वागावे...

राजाने राजासारखे वागावे...

२६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक लोकशाही देश झाला. आपण लोकशाही स्वीकारली. ७५ वर्षे उलटल्यानंतरही आपल्या लोकांना याचा अर्थ नीटसा समजला नाही असे म्हणावे लागते. लोकशाही याचा अर्थ या देशावर 'लोकांची' सत्ता असणार आहे. लोकांची म्हणजे कोणा एका व्यक्तीची किंवा समुहाची नव्हे, तर सकल जनतेची सत्ता असणार आहे. त्यासाठी परस्पर सामंजस्य आणि इतरांचे हित पाहण्याचा दृष्टिकोण आपल्या दैनंदिन आचरणात असला पाहिजे. 

ही लोकशाही समाजव्यवस्था अलीकडे राजकारणाने पूर्णतः बिघडून टाकली आहे. भारत कृषीप्रधान देश आहे असे आपण म्हणतो; ते केवळ म्हणण्यापुरतेच राहिले आहे. 'शेतकरी हा राजा आहे', 'ग्राहक हा राजा आहे', 'गुरुजन हे पूज्य आहेत', 'कलावंत हे श्रेष्ठ आहेत', 'नेते हे माननीय आहेत'... वगैरे बकवास शिल्लक राहिली. पण समाजातील हे सर्वच घटक स्वतःला कंगाल समजून काहीतरी सवलती, अनुदाने, मदत मागत फिरतात असे दृश्य आपल्या लोकशाहीत दिसू लागले आहे. आपले अधिकार आणि हक्क मिळवण्यासाठी कुणाच्या तरी हक्कांवर आक्रमण करणे रूढ झाले आहे. 

शेतकरी आंदोलन करतात, ते कुणाविरुद्ध असते हे कळेनासे झाले आहे. ते राज्यकर्त्यांच्या विरोधात आहे असे म्हणावे तर त्यांच्या आंदोलनाचा त्रास पुष्कळ शेतकऱ्यांनाच होतो. जिचा त्या प्रश्णांशी फारसा संबंध नसतो, अशा अन्य जनतेलाही पुरेपूर त्रास होत असतो. याला लोकशाही म्हणत नाहीत. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळायला हवा हे जसे खरे, तसे शेतीमालाच्या ग्राहकांना तोच माल स्वस्तात मिळायला हवा असतो. कांद्याचा भाव वाढला तर शेतकऱ्यांना पैसे जास्त मिळतात, पण कांदा खाणारा ग्राहक त्यामुळे महागाईविरोधात आंदोलन करू शकतो. म्हणजेच आंदोलन कुणासाठी; आणि प्रश्न सोडवायचा कसा याची कोणालाच दखल नाही, आणि फिकीरही नाही. एखाद्या कारखान्यामध्ये कामगारांनी पगारवाढीसाठी संप करावा इथपर्यंत आंदोलन ठीक असते. पण त्यांनी मोर्चा काढून गावात हाणामाऱ्या आणि जाळपोळ करीत सुटावे याला लोकशाही म्हणत नाहीत. 

शेतकरी हा एक समाजघटक आहे. तो अन्नदाता तर आहेच, पण पुरेशा जबाबदारीने तो वागला तरच त्याला राजेपद प्राप्त होईल. अलीकडे राजेपद मिरवणारे मोठे लोकही सरकार नावाच्या प्रशासनाकडे काहीतरी मागण्यासाठी धरणे आंदोलने करीत असतात. राजाने राजासारखे वागावे. राजाने आपल्यावर अवलंबून असलेल्या प्रजेची काळजी घ्यावी, यातच राजेपण आहे. शेतकऱ्यांच्या दिलदारपणाचे कौतुक केले जाते, ते त्याच्या या राजस वागण्यासाठी! 

आपल्याला लोकशाही मिळून ७५ वर्षे झाल्यानंतर, समाजातील प्रत्येक घटकाने 'या देशाचा चालक-मालक-पालक मी आहे' असे समजूनच वागले पाहिजे. आपल्याला उत्तम रस्ते हवेत म्हणून, परदेशांशी तुलना करून, आपण तिकडच्या लोकांचे कौतुक करतो. पण आपल्या घरच्या लग्नासाठी रस्त्यात मांडव घालणे किंवा खड्डे काढणे हे परदेशांमध्ये चालत नाही. रस्त्यात कचरा टाकला तर, किंवा सार्वजनिक बागेत पाळीव कुत्र्याने शी केली तर, परदेशांत ती मालकाला काढावी लागते. हा नियम आपल्या देशात केला तरी आपण लोक तो पाळणारच नाही. धुंकणे हा तर आपला सार्वत्रिक अधिकार होऊन बसला आहे. धुंकू नये म्हणून सरकारने कायदा केला तर तो न पाळणारे लोक, हेच इथले मालक आहेत. आपल्याच संपदेचे नुकसान करून त्यावर घाण करण्याचा अधिकार, मालक म्हणून आपण बजावतो, पण ही मालमत्ता स्वच्छ करण्याचे कर्तव्य मात्र मालक असूनही आपण बजावत नाही. ही लोकशाही कशी समजावी ? 

कळंब किंवा कदंब ही झाडे भारतात पूर्व हिमालयाच्या पायथ्यापासून महाराष्ट्र, बंगाल, ओरिसा व आंध्र प्रदेश या राज्यांत आर्द्र पानझडी जंगलात आढळतात. महाराष्ट्राच्या कोकण व मावळ भागात हा वन्य वृक्ष दिसतो. साधारण १० ते २५ मीटर उंचीपर्यंत हा वाढतो. मार्चमधे थोड्या काळासाठी पानगळ होते, व पावसाळ्यात जुलै ऑगस्टमधे कदंबाला फुले येऊ लागतात. 

इतिहासात प्रसिद्ध असणाऱ्या आधी ब्राह्मण व नंतर क्षत्रिय झालेल्या कदंब कुळाची उत्पत्ती या झाडाखाली झाल्याचे नमूद आहे. कदंबाचे झाड हे क्षत्रिय कदम मराठा घराण्यातील लग्नामध्ये देवक म्हणून पूजले जाते. हे झाड श्रीकृष्णाचे आवडते झाड म्हटले प्रत्येकाने उत्तम जगण्यासाठी परस्पर सहकार्य, पररपर अवलंबित्व, आणि परस्पर उपभोग याला लोकशाही म्हणतात. आपल्याकडे कोणत्याही जातीचा, कोणत्याही उत्पादकाचा, कोणत्याही राजकीय पक्षाचा हेतू एकच असतो, तो म्हणजे माझ्या हक्काची अरेरावी गाजवीत सुटणे. आम्हाला दुबळे म्हणा, आम्हाला अपंग म्हणा, आम्हाला ग्रामीण भागातील अडाणी जनता म्हणा, पण आम्हाला सोयी सवलती द्या; असल्या काहीतरी विक्षिप्त पण जहाल मागण्या करण्याला आपण लोकशाही आणि अधिकार म्हणू लागलो आहोत. हे ७५ वर्षानंतरचे चित्र कधी बदलेल ? 

यापुढे प्रत्येक घटकाने यावरती विचार करून स्वतःची जबाबदारी पार पाडली पाहिजे. हक्क आणि अधिकार याचबरोबर जबाबदारी आणि कर्तव्यही येते, ते मात्र आपण टाळतो. शेतकरी म्हणून आपण याचा प्राधान्याने, प्रामुख्याने आणि अग्रक्रमाने विचार करायला हवा. आपण शेतकरी राजे आहोत, राजासारखे वागूया. प्रजेचे प्रतिपालन करूया. त्यासाठी 'उत्पादनात वाढ, उपभोगावर संयम आणि वितरणात समानता' असे सूत्र अंगी बाणवून, यापुढे आपल्या देशाची समृद्धी वाढवूया. लोकराज्याची ७५ वर्षे होत असताना तसा संकल्प करणे अत्यंत आवश्यक आहे. 

कदंबवनातील आल्हाद आहे. महाभारतात प्रसिद्ध असणारा कर्ण (कुंतीचा कर्णजन्माचा वृत्तांत) याच झाडाखाली मोठा झाला. कदंब वृक्षाला इतिहासात व हिंदू साहित्यात मानाचे स्थान आहे. 

निसर्गप्रेमींना भुरळ पाडणारा कदंब वृक्ष अत्यंत राजस दिसतो. निसर्गात पूर्ण वाढलेल्या वृक्षाची उंची ३० मीटरपर्यंत जाते. रोप लावल्यापासून पहिले सहा ते आठ वर्षांपर्यंत वाढ भरभर होते, मग स्थिरावते आणि २० वर्षांपर्यंत पूर्ण होते. हा वृक्ष दीर्घायुषी असून शंभर वर्षं जगू शकतो. कदंबाच्या ताठ राखाडी रंगाच्या बुंध्यावर काटकोनात पसरलेल्या फांद्यांमुळे वृक्षाचा आकार छत्रीसारखा दिसतो. पानगळ होते पण संपूर्ण निष्पर्ण वृक्ष आढळत नाही, कारण याची पाने एकदम गळत नाहीत. ही पाने आंब्याच्या आकाराची पण जरा रुंद असतात. पुढून हिरवीगार व तुकतुकीत असतात अन् मागच्या बाजूने काहीशी फिकट लवयुक्त असतात. पानांवरच्या शिरा उठून दिसतात. 

वृक्षाची खरी मजा त्याच्या फुलांमध्ये आहे. संस्कृत काव्यात कदंब फुलण्याचा संबंध पावसाशी जोडला आहे. ढगांचा गडगडाट ऐकल्यावरच कदंब फुलतो, असे म्हणतात. 

 

Back to blog