Skip to product information
1 of 4

Nature Care Fertilizers

Attraps Fruit Fly | अट्रॅप फळमाशी

फळ पिकांतील फळमाशी, थ्रीप्स, तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी स्प्रे स्वरूपातील उत्पादन | Product in spray form for the control of fruit flies, thrips, weevils in fruit crops

Years In Use : 1

MRPRegular price Rs. 820.00   (incl. of all taxes)
Regular price Sale price Rs. 820.00
Sale Sold out
Tax included.
  • FREE SHIPPING on all orders over Rs.500 | रु.५०० वरील सर्व ऑर्डरवर मोफत शिपिंग


  • अॅट्रॅप्स फ्रुटफ्लाय हे चिकट पदार्थ (गम), फेरेमोन (कामगंध) व पिवळा रंग असे सक्रिय घटक असलेले एरोसोल युक्त स्प्रे स्वरुपातील नाविन्यपूर्ण उत्पादन आहे. 
  • फळमाशी, तुडतुडे, फुलकिडे, रसशोषक किडी अशा अनेक प्रकारच्या किडींना आकर्षित करून त्यांचा बंदोबस्त करते.
  • टाकाऊ प्लॅस्टिकच्या वस्तूंवर फवारणी करून शेतामध्ये वापर करू शकतो. 
  • अॅट्रॅप्स ‘स्प्रे’ स्वरूपात असल्याने वापरण्यास अत्यंत सोपे, पर्यावरणपूरक व कमी खर्चिक आहे. 


  • Atraps fruit fly is a sticky substance (gum), pheromone (odor) and yellow color. An innovative product in the form of an aerosol containing active ingredients. 
  • Attracts and settles many types of insects such as flies, thrips, thrips, suckers .
  • Can be sprayed on disposable plastic items and used in the field. 
  • Atraps is very easy to use, eco-friendly and cost-effective as it comes in 'spray' form. 

Quantity : 150ML

View full details

Collapsible content

Additional Information

  • अॅट्ट्रप्स फ्रूटफ्लाय हे सर्व फळ पिकांमध्ये उपयुक्त आहे, यामध्ये कामगंध असल्याने मोठ्याप्रमाणावर कीटकांना आकर्षित करते.
  • बाजारात उपलब्ध असणाऱ्या कामगंध (ल्युअर) लहान आकाराची असल्याने वातावरणात कामगंध तुलनेने कमी पसरतो. परंतु अॅट्रॅप्स फवारणीयोग्य असल्याने ज्या वस्तूवर आपण फवारणी करतो त्याचा संपूर्ण पृष्ठभाग कामगंधयुक्त सापळा म्हणून वापरला जातो.
  • त्यामुळे इतर कामगंध व चिकट संपाळ्यांच्या तुलनेत कमी खर्चात अधिक कीड नियंत्रण होते. 
  • अॅट्रॅप्स फ्रूटफ्लाय स्प्रे केलेल्या दिवसापासून 20 ते 30 दिवसांपर्यंत कार्यरत राहते.
  • अॅट्रॅप्स फ्रूटफ्लाय ची एक बॉटल एक ते दीड एकर क्षेत्रासाठी उपयोगी पडते.
  • अॅट्रॅप्स  फ्रूटफ्लाय स्प्रे हा आंबा,संत्री, मोसंबी, पेरु, बोर, पपई व द्राक्ष या सर्व फळ पिकातील डंखमाशी (फळमाशी) पूर्णपणे नियंत्रित करते.

Size: 150 ML

Benefits

  • 'अट्रॅप फळमाशी' हे तिहेरी फायदा देणारे उत्पादन आहे.
  • 'अट्रॅप फळमाशी' मधील पिवळ्या रंगामुळे इतर रसशोषक किडी देखील त्याकडे आकर्षित
    होतात.
  • 'अट्रॅप फळमाशी' मधील फेरोमोन हा चिकट गम मध्ये असल्यामुळे तो हळूहळू वातावरणात मिसळतो. पाऊसपाण्यामुळे तो धुतला जात नाही. त्यामुळे तो दीर्घकाळ
    परिणाम देतो.
  • 'अट्रॅप फळमाशी' हे पर्यावरण स्नेही उत्पादन आहे. प्लास्टिक प्रदूषण कमी होण्यास त्यामुळे मदत होते. याचे पॅकिंग देखील १००% रीसायक्लेबल एल्यूमिनिअमने बनलेले आहे.

  • 'Atrap Fruit Flies' is a triple benefit product.
  • The yellow color in 'Atrap Fruit Flies' also attracts other sap-sucking insects to it.
  • The pheromone in 'Atrap Fruit Flies' is contained in a sticky gum that slowly mixes with the environment. It is not washed away by rainwater. So it gives long lasting results.
  • 'Atrap fruit fly' is an eco friendly product. It helps in reducing plastic pollution. Its packing is also made of 100% recyclable aluminum.

Uses | Dosage

एकरी एक बॉटल

'अट्रॅप फळमाशी' कसे वापरावे?

तीन स्टेप मध्ये याचा सोपा उपयोग आहे.
१. टाकाऊ रिकाम्या बाटल्या, कॅन, पात्र, शीट यासारखी
वस्तू घ्या. तुला साफ आणि कोरडी करा.
२. 'अट्रॅप फळमाशी' तिच्यावर व्यवस्थित फवारा.
३. ज्या उंचीवर फळे लागतात त्या उंचीवर हि
वस्तू टांगा.

Composition

Attractant and Stabilizer - 60% Propellant - 40%