Poorva Hangam
ऊस पिक हंगामनिहाय नियोजन
पूर्व हंगाम - कालावधी- 25 सप्टेंबर ते 15 डिसेंबर
अ) एकवेळ सबसॉयलर व एकवेळ उभी आडवी नांगरट करावी. ( काळी माती - ३ वर्षातून १ वेळा )
ब) उपलब्ध असल्यास १० ते १२ टन शेणखत वापरावे, शेणखत उपलब्ध नसल्यास ग्रीन हार्वेस्ट सारख्या पेंडीयुक्त खताचा वापर करावा.
अ) हलक्या जमिनीत ताग व भारी जमिनीत धेंचा घ्यावा.
ब) शक्यतो सरी वरंबा पध्दतीने घ्यावा व २५ किलो प्रति एकर बियाणे वापरावे.
क) ४५ ते ६० दिवसांमध्ये जमिनीमध्ये गाडावे.
को - 86032, को. सी. - 671, व्हि. एस. आय.- 8005, व्हि. एस. आय - 434
अ) लागणीचे ९ ते १० महिन्याचे, जाड व लांब कांड्यांचे असावे.
ब) खोडव्यातील, आखूड कांड्याचे, मुळ्या सुटलेले, पांगशा फुटलेले व तुरा आलेले बियाणे घेऊ नये.
1. रासायनिक - एकरी १०० लिटर पाणी + १०० मिली गाऊचो + १०० मिली फॉलीक्युअर या द्रावणात १० मिनीटे बियाणे बुडवून नंतर अर्ध्या तासांनी लागण करावी.
2. जैविक - सुपर एन + सुपर पी + सुपर के - ५०० ग्रॅम सुपर सुडो + सुपर ट्रायको + सुपर पॅसिलो - ५०० ग्रॅम
अ) पहिले अथवा दुसरे पाणी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी ओल्या जमिनीत एकरी २०० लिटर पाणी + ५०० ग्रॅम सेंकॉर किंवा टाटामेट्रि + १ लिटर २-४ डी. किंवा ५०० ग्रॅम अँट्राझीन वापरावे.
ब) लागण झाल्यानंतर २० ते ३० दिवसादरम्यान, तण दिसावयास लागल्यानंतर ओल्या जमिनीत एकरी २०० लि. पाणी + ११५ ग्रॅम लॉडीस + ५०० ग्रॅम सेंकॉर किंवा ५०० ग्रॅम अँट्राझीन वापरावे.
अ) लागणीनंतर त्वरित पाणी द्यावे, त्यानंतर ५ ते ६ दिवसांनी अंबवणीचे पाणी द्यावे.
ब) दोन पाण्याच्या पाळ्यातील अंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० दिवस ठेवावे.
क) पहिल्या दीड महिन्यात २५ % सरीभरून पाणी, पुढील दीड महिन्यात ५० % सरी भरून पाणी, ३ महिन्यापासून ऊस तुटण्या आधी २ महिने ७५ % सरी भरून पाणी, तसेच ऊस तुटण्याअगोदर २ महिने २५ % ते ५० % पाणी द्यावे.
कांदा, बटाटा, कोबी, फ्लॉवर, हरभरा, पालेभाज्या.