शेती ही सूक्ष्मजीवांच्या मदतीनेच होतं असते. जर या सूक्ष्मजीवांचे मातीतील व्यवहार कसे चालतात ते शेतकऱ्याला माहिती असेल तर त्याचा आपण खुबीने शेतीत उपयोग करू शकतो. सूक्ष्मजीव हे बहुधा एकपशीय असतात. त्यांचे वर्गीकरण ही पुढील प्रमाणे असते.
1) बॅक्टएरिया 2)ऍक्टिनोमायसेट्स 3) बुरशी (फंगस ) 4) अलगी 5) प्रोटोझोआ 6)व्हायरस 7)सूत्रकृमी
शेतीसाठी फायदेशीर असणाऱ्या सूक्ष्मजीवांना सकारात्मक सूक्ष्मजीव असे म्हणतात तर शेतीमध्ये नुकसान करणाऱ्या सूक्ष्मजीवांना विकारात्मक सूक्ष्मजीव असे म्हणतात.
मागील दोन तीन दशकात, शेतीत रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आणि तुलनेने सेंद्रिय खतांचा वापर कमी झाला.तसेच बऱ्याच पिकांमध्ये पाटपाणी दिल्यामुळे देखील मातीत पाण्याचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त झाले.
या सर्वांचा परिणाम मातीतील उपयुक्त सूक्ष्मजिवाणूच्या वाढीवर झाला. मातीचे प्रामुख्याने,भौतिक, जैविक गुणधर्म आणि पर्यायाने रासायनिक गुणधर्म बिघडले. याचा परिणाम मातीच्या सुपीकतेवर झालाच पण त्यांचसोबत गेल्या काही वर्षात मातीतून येणाऱ्या रोग किडींचे प्रमाण वाढले आहे. यात प्रामुख्याने मर रोग आणि सूत्रकृमी चा अटॅक वेगवेगळ्या पिकात मोठ्या प्रमाणात वाढला आहे..मर रोग ज्या अपायकारक बुरशी किंवा जिवाणूमुळे येतो त्यामध्ये प्रामुख्याने फ्युजारीयम, पिथीयम, फायटोपथोरा, रायझोकटोनीया इत्यादीचा समावेश होतो...
यावर कंट्रोल मिळावायला, शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक औषधंचा वापर करतात. परंतु सुरुवातीपासून प्रतिबंधात्मक उपाय केले नसतील (preventive measures) तर पुढे जाऊन उपाय योजनाचे खर्च वाढतात, रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्याने पिकाचे मोठे नुकसान होऊन शेवटी लॉस होण्याची शक्यता जास्त असते. त्यांचसोबत,रासायनिक औषधंचा मातीत जास्त वापर केल्याने मित्रबुरशी, मित्रजिवाणूचा मोठ्या प्रमाणात नाश होतो व जमिनीची सुपीकता कमी होते..
मर रोग व सूत्रकृमी यांच्या नियंत्रणासाठी *WMF हे उत्पादन एकदम फायदेशीर आहे.
WMF हे उत्पादन वापरल्यास विविध पिकातील मर रोग (उदा. डाळिंबातील मर रोग व डाय बॅक, हळद व आल्यातील कंदकूज, भाजीपाला पिकातील,ढबू -साधी मिरचीतील मर रोग इत्यादी...) तसेच विविध पिकातील सूत्रकृमी यावर उत्तम कंट्रोल मिळतो..
पिकाच्या लागवड अवस्थेपासून याचा वापर करावा... जेणेकरून पुढे जाऊन रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही व रासायनिक औषधे वापरण्याची गरज भासणार नाही..