धारण आणि मरण कोणाला सांगता येत नाही असे म्हणतात. गेल्या काही वर्षांत शेतीमालाचे दर वाढवून द्यावेत म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलने चालू ठेवली आहेत. त्याविषयी कायदे झाले, किंवा दर निश्चित केले तरी त्यांतून शेतकऱ्यांना समाधान मिळालेले नाही हे वास्तव आहे. गेल्या दिवाळीपासून ऊस आंदोलन पेटू लागले. एव्हाना साखर कारखाने मार्गी लागून साखर उत्पादन वाढायला हवे होते. त्याऐवजी ठिय्या आंदोलने आणि रस्ता रोको सुरू राहिले. त्यामुळे ज्यांना ऊस कारखान्यापर्यंत न्यायचा होता त्यांचाही खोळंबा झाला. अशा प्रकारे झुंड आंदोलने चालू राहिली तर शेतकऱ्यांना चार पैसे मिळतील हे खरे, पण यातून आंदोलन हाच एक नवा उद्योग तयार होतो त्याचीही काळजी शेतकऱ्यांनी केली पाहिजे.
दराचा अंदाज तसा कोणालाच येत नाही. शेतीमालाचे बाजुलाच राहद्या; पण बाजारातील इतर वस्तूसुद्धा खाली-वर होत असतात. एकेकाळी फोन मिळवण्यासाठी वाट पाहावी लागत असे. पैसे भरून वशिला लावल्याशिवाय फोनसारखी वस्तू लोकांना मिळत नव्हती. बजाज कंपनीची स्कूटर एकेकाळी नऊ नऊ वर्षे मिळत नसे. याउलट गाड्यांचा धंदा आता इतका रोडावला की, रस्त्याकडेला तंबू टाकून, गाड्यांची मांडणी करून, 'या या, गाडी घ्या..' असे ओरडत बसलेले लोक आपल्याला दिसतात. कापड उद्योगही तेजी मंदी होत असतो.
व्यापारी सांगेल तो दर ग्राहकही मान्य करतो असे नाही. किंबहुना ग्राहकाचे हे कर्तव्यच आहे की त्याने प्रत्येक वस्तूची, त्याच्या गुणवत्तेची आणि दराची चौकशी करूनच खरेदी केली पाहिजे. चार ठिकाणी चौकशी केल्याशिवाय आठवड्याच्या बाजारात आपण भाजीची पेंडीसुद्धा खरेदी करत नाही. मतितार्थ असा की, विक्री करणाऱ्याला आणि खरेदी करणाऱ्याला गरज किती आणि कशी आहे यावर बाजारभाव ठरतो. त्यासाठी एका मर्यादेपर्यंत आंदोलन करणे हेही समजू शकते; पण त्याचा अतिरेक होऊ लागला आहे हेही नमूद केले पाहिजे.
गेल्या पाच-सहा महिन्यांत टोमॅटोने कितीतरी उसळ्या खाल्ल्या आणि मरगळही अनुभवली. टोमॅटोचेच उदाहरण द्यायचे तर, गेल्या काही दिवसांतील त्याचा दर सतत चढ-उतार झाला. चालू वर्षातच मे महिन्यात ३० रुपये, जून-१०० रुपये, जुलै-२०० रुपये, ऑगस्टमध्ये १९० रुपये, ऑगस्ट अखेर १२० रुपये, सप्टेंबर ३०रु., ऑक्टोबर ३५रु. आणि नोव्हेंबरअखेरीस ६० रुपये इतके खालीवर झाले. येत्या काळात हे दर कधी कमी होतील
डॉ. हेमांगी जांभेकर या प्रमुख मंडळींचे मार्गदर्शन त्यांना लाभले. मातीचे मोल जाणून तिचे आरोग्य जपणे हेच ध्येय बाबांनी आपल्यासमोर ठेवले आणि झपाटून काम सुरू केले.
आम्ही त्यांच्यासोबत काम करू लागल्यावर त्यांनी दाभोलकर सरांचे एक वाक्य वारंवार सांगितले. ते म्हणजे, "पडीक मन नसेल तर पडीक भूमी या देशात असणार नाही" हेच वाक्य समोर ठेवून ते काम करीत राहिले आणि आम्हालाही त्याच सूत्रावर प्रोत्साहन देत राहिले.
केवळ स्वतःच्या शेतीला सेंद्रिय खताचा पुरवठा चालू झाला, तरी इतरांसाठीही या परंपरागत समृद्धीचा मार्ग दाखवून देण्यासाठी, सेंद्रिय खत तयार करून ते सर्वत्र वितरित करण्याची योजना बाबांच्या नेतृत्वाखाली आम्हा कुटुंबियांनी केली. ९ मे १९९७ या दिवशी नेचर केअर फर्टिलायझर्स (प्रा) लि. या नावाने उद्योग सुरू करून, रासायनिक खतांना पर्याय म्हणून सेंद्रिय खत मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याचा कारखाना विट्याच्या जवळच सुरू झाला. त्याला पाहता पाहता २५ वर्षे उलटली.
आज मागे वळून पाहताना समजते की कित्येक अडचणी आल्या तसेच अनेकांचे सहकार्यही लाभत गेले. बाबांचे सतत प्रोत्साहन आणि सगळ्यांचा उत्साह वाढविणारे पाठबळ यांमुळे आज खरोखरीच मोठा पल्ला आम्ही गाठला आहे अशी जाणीव होते. सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय खत या विषयात काम करणे म्हणजे प्रवाहाविरुद्ध पोहणे होते; पण बाबा त्यावरही प्रतिवाद करीत असत की, मेलेले मासे प्रवाहाबरोबर वाहून जातात आणि जिवंत मासे प्रवाहाविरुद्ध पोहत असतात. तुमचे ०४ प्रवाहाविरुद्ध पोहणे हे तर जिवंतपणाचे लक्षण आहे. असे
विचार आणि प्रत्यक्ष त्यांचे काम हेच आमच्यासमोर सतत असल्यामुळे आम्ही थांबून राहण्याचा कधी प्रश्नच उद्भवला नाही. आज भारतातील सात राज्ये आणि काही प्रमाणात विदेशांतूनही निर्यात होत असलेले आमचे सेंद्रिय खत हे रासायनिक शेतीला पर्याय म्हणून जमिनीशी एकरूप होत आहे.
आम्ही उत्पादन करीत असलेल्या मालाचा प्रचार आणि प्रसार करून ते उत्पादन आणि वितरण वाढविण्यासाठी माझे अनेक सहकारी सतत योगदान देत असतात. या सर्व परिवाराचा मला सार्थ अभिमान आहे. या सगळ्यांशी पारिवारिक संबंध निर्माण झालेले असल्यामुळे नेचर केअर हे एक विशाल कुटुंब बनले आहे. या मासिकाचा उपक्रम सुरू करूनही चार वर्षे होऊन गेली. या माध्यमातून सर्वत्र आमच्या कंपनीचे नाते जोडले जात आहे. खत जमिनीला पूरक असते आणि त्यातून शुद्ध आणि संपन्न उत्पादन मिळत असते. तोच प्रयोग आमचा कारखाना आणि आमचे हे प्रसारमाध्यम यांच्या बाबतीतही आम्ही अनुभवतो आहोत.
आमच्या कारखान्याला २५ वर्षे होऊन गेली. परंपरागत ज्ञानाला नवीन धुमारे फुटले तर नव्या भारतासाठी शेतीच्या माध्यमातून नवी शक्ती निर्माण होईल यात वादच नाही. या नव्या दृष्टिकोणातून आम्ही विट्यासारख्या छोट्या गावातूनही साऱ्या जगावर दृष्टी ठेवून आहोत. आपण सर्वजण या कामाला शुभेच्छा देत आहात आणि आशीर्वादही देत आहात, त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.
- जयदेव बर्वे, सौ. कामाक्षी बर्वे
अनोखे ऋणानुबंध
ती. बाबा प्रथमतः शिक्षणाच्या निमित्ताने पुण्याला गेले, ते मीरा मावशी व श्री. धनंजय दिनकर पाटणकर यांच्या शेजारी, सातारकर यांच्या बंगल्यातील जागेत राहिले. हळूहळू या पाटणकर कुटुंबाशी आई-बाबांचा घरोबा इतका वाढत गेला की, ते घर म्हणजे 'आम्हा बर्थ्यांचे थोरले घर' होऊन गेले. आमच्या घरातील लग्नकार्य असो, महत्त्वाचे निर्णय असोत, नव्या उद्योगांची पायाभरणी असो प्रत्येक गोष्टीचे निर्णय पाटणकर काका-मावशी यांच्याकडे होत असत. आज ते दोघेही नाहीत, पण आमच्या या थोरल्या घराचे आशीर्वाद आमच्या कुटुंबावर सतत राहिले आहेत.