नेचर केअर फर्टिलायझर्स प्रा. लि., विटा.

'जमीन वाचवा देश वाचवा' या ध्येयाने सेंद्रिय खत निर्मिती करून शाश्वत शेतीचा ठोस पर्याय देणारे नाव म्हणजे नेचर केअर फर्टिलायझर्स प्रा. लि., विटा. हि ISO 9001:2015 प्रमाणित सेंद्रिय खत उत्पादक कंपनी असून याची स्थापना सन १९९७ साली श्री. जयंत वामन तथा बाबा बर्वे यांनी केली.

पुढे वाचा

ष्ठा उत्पादनासाठी गेल्या ४० हून अधिक काळ सेंद्रिय शेती मध्ये कार्यरत राहून तत्कालीन शेतीच्या प्रवाहाविरुध्द प्रवास करून श्री. बाबा बर्वे यांनी विषमुक्त शेती आणि विषमुक्त अन्न यासाठी अथक संशोधन केले. रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनीचा कमी होणारा कस आणि त्यातून उद्भवणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी रासायनिक खतास पर्याय म्हणून “ग्रीन हार्वेस्ट” या पेंडीयुक्त सेंद्रिय खताची निर्मिती केली.

१९९७ पासून संपूर्ण महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, राजस्थान, आंध्रप्रदेश या राज्यांसोबत केनिया, टांझानिया, अंगोला, मॉरीशस या देशांमध्ये नेचर केअरचा यशस्वी प्रवास सुरु आहे.

नेचर केअर आज ग्रीन हार्वेस्ट, ग्रीन हार्वेस्ट स्पेशल, ग्रीन हार्वेस्ट दाणेदार या सेंद्रिय खतांसोबत जैविक खते, पॉलीफॉस्फेट खते घेऊन आधुनिक शेतीसाठी एकात्मिक खत व्यवस्थापन तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांच्या सेवेत सज्ज आहे.

नेचर केअरच्या सर्व उत्पादनांना महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यांच्या कृषी विभागाने प्रमाणित केले आहे, तसेच हि सर्व दर्जेदार उत्पादने इकोसर्ट या आंतरराष्ट्रीय संस्थे द्वारे USDA NOP, EU व NPOP या सेंद्रिय मानकानुसार प्रमाणित आहेत. राहुरी कृषी विद्यापीठ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, ICAR गोवा तसेच केनिया शुगर बोर्ड, मोरोगोरो युनिव्हर्सिटी, टांझानिया. योकोहामा नर्सरी जपान या देशविदेशातील विविध कृषी संस्थांमधून नेचर केअरच्या सर्व उत्पादनांच्या विविध पिकांवर अत्यंत काटेकोर व यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

नेचर केअरचे उत्पादन स्थळ विटा येथे असून तेथील सुसज्ज लॅबोरेटरी मधून सर्व कच्चा माल व उत्पादित केलेल्या मालाची चाचणी अत्याधुनिक उपकरणांद्वारे केली जाते ज्यायोगे सर्व उत्पादने अत्यंत दर्जेदार पद्धतीने तयार होतात.

मातीचे आरोग्य चांगले राखणे व पर्यावरणाची हानी न करता कमीतकमी उत्पादन खर्चात जास्तीत जास्त शेती उत्पादन मिळविण्यासाठी आमचे सर्व प्रशिक्षित कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून मातीच्या व पिकाच्या गरजेनुसार योग्य मार्गदर्शन करीत असतात.
आजच्या काळात अन्न सुरक्षा आणि सुरक्षित अन्न यासाठी एकात्मिक खत व्यवस्थापनातून EVER GREEN Revolution करण्यास नेचर केअर फर्टिलायझर्स परिवार सदैव कटिबद्ध राहील.

1 of 5