Nature Care Sanman 2026
महिला शेतकऱ्यांचा सन्मान 🎉
संयुक्त राष्ट्र संघाने (UN) २०२६ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. याचे औचित्य साधून यंदाचा हा राज्यस्तरीय पुरस्कार ‘महिला शेतकरी’ या विषयासाठी समर्पित करण्यात आला असून, यासाठी पात्र महिलांकडून प्रवेशिका मागवण्यात आल्या आहेत.
पुरस्काराची पार्श्वभूमी व स्वरूप
गेल्या २९ वर्षांपासून सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसार करणाऱ्या नेचर केअर फर्टिलायझर्सच्या वतीने २०२३ पासून हा उपक्रम राबविला जात आहे. यापूर्वी देशी बीज संवर्धन, भरडधान्य उत्पादन आणि वृक्ष संवर्धन या क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला आहे. यंदा महाराष्ट्रातील पाच विविध विभागांतून ५ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या प्रत्येक पुरस्कारार्थीस रोख ५१,००० रुपये, मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन एका विशेष समारंभात गौरविण्यात येईल.
पुरस्कारासाठी निवडीचे निकष
१. महिला शेतकरी अल्पभूधारक (५ एकर पर्यंत जमीन) असावी व त्याबाबतचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
२. कमीत कमी ५ वर्षांपासून स्वतः शेती करीत असावी व शेतीमधून कुटुंबासाठी आर्थिक हातभार लावलेला असावा.
३. हा पुरस्कार केवळ महाराष्ट्र राज्यातील रहिवासी महिला तसेच बेळगाव जिल्हा व गोवा राज्यातील महिला शेतकऱ्यांसाठी मर्यादित आहे.
४. गूगल फॉर्म (प्रवेशिका) मधील सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत.
अर्ज करण्याची पद्धत व मुदत
या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आहे. अर्जाचा नमुना, सविस्तर नियम आणि गुगल फॉर्मची लिंक संस्थेच्या www.naturecarefertilizers.com या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक महिलांनी किंवा त्यांच्या कार्याची माहिती असणाऱ्यांनी ९८८१५८४१६० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेतीची धुरा सांभाळणाऱ्या जास्तीत जास्त महिला शेतकऱ्यांनी या पुरस्कारासाठी आपल्या कार्याची माहिती पाठवावी, असे आवाहन संस्थेचे संचालक श्री. जयंत बर्वे आणि श्री. जयदेव बर्वे यांनी केले आहे .
———————
छापील स्वरूपात प्रस्ताव पाठविण्यासाठी पत्ता व संपर्क क्र.
नेचर केअर फर्टिलायझर्स प्रा. लि. विटा
224, रिलायन्स (Jio) पेट्रोल पंपाजवळ, कराड रोड, विटा. 415311
ता. खानापूर, जि. सांगली
संपर्क - 9881584160
WhatsApp द्वारे प्रस्ताव पाठविण्यासाठी क्रमांक - 9881584160
Email द्वारे प्रस्ताव पाठवण्यासाठी - info@naturecarefertilizers.com
Pdf स्वरूपात अर्ज डाउनलोड करण्यासाठी- Download PDF
छापील स्वरूपात प्रस्ताव पाठविण्यासाठी
कृपया अर्ज डाउनलोड करा, त्यामधील सर्व आवश्यक माहिती भरा आणि पूर्ण भरलेला अर्ज दस्तऐवजासह दिलेल्या पत्त्यावर कुरिअरद्वारे आम्हाला पाठवा.