Skip to product information
1 of 6

Nature Care Fertilizers

अॅट्रॅप्स ऑल राऊंडर

भाजीपाला, वेलवर्गीय फळे व फळभाज्या पिकांतील फळमाशी, थ्रीप्स, तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी स्प्रे स्वरूपातील उत्पादन

वापरात असलेली वर्षे : गेल्या 1 वर्षापासून

MRPRegular price Rs. 820.00   (incl. of all taxes)
Regular price Sale price Rs. 820.00
Sale Sold out
Tax included.
  • रु.४९९ वरील सर्व ऑर्डरवर मोफत शिपिंग




  • अॅट्रॅप्स ऑल राऊंडर हे चिकट पदार्थ (गम), फेरेमोन (कामगंध) व पिवळा रंग असे सक्रिय घटक असलेले एरोसेल युक्त स्प्रे स्वरुपातील नाविन्यपूर्ण उत्पादन आहे. 
  • अॅट्रॅप्स ऑल राऊंडर हे भाजीपाला पिकांतील फळमाशी, पांढरीमाशी, तुडतुडे, काळा मावा, फुलकिडे, रसशोषक किडी अशा अनेक प्रकारच्या किडींना आकर्षित करून त्यांचा बंदोबस्त करते.
  • टाकाऊ प्लॅस्टिकच्या वस्तूंवर फवारणी करून शेतीमध्ये वापर करू शकतो. 
  • अॅट्रॅप्स ‘स्प्रे’ स्वरूपात असल्याने वापरण्यास अत्यंत सोपे, पर्यावरणपूरक व कमी खर्चिक आहे. 

 

प्रमाण : १८० मिलीलीटर
View full details

Collapsible content

अतिरिक्त माहिती

प्रमाण : १८० मिलीलीटर
  • अॅट्रॅप्स ऑल राऊंडर हे सर्व भाजीपाला पिके तसेच वेलवर्गीय पिके, सोयाबीन, कापूस, कडधान्य पिके यांमध्ये उपयुक्त आहे. अॅट्रॅप्स ऑल राऊंडर हे मोठ्याप्रमाणावर कीटकांना आकर्षित करते.
  • वेलवर्गीय फळ पिकांमध्ये म्हणजे टरबूज, खरबूज, कलिंगड याव्यतिरिक्त काकडी वर्गीय पिके, फळभाज्या यामध्ये अॅट्रॅप्स ऑल राऊंडर वापरावे.
  • बाजारात उपलब्ध असणाऱ्या कामगंध (ल्युअर) लहान आकाराची असल्याने वातावरणात कामगंध तुलनेने कमी पसरतो. परंतु अॅट्रॅप्स फवारणीयोग्य असल्याने ज्या वस्तूवर आपण फवारणी करतो त्याचा संपूर्ण पृष्ठभाग कामगंधयुक्त सापळा म्हणून वापरला जातो.
  • त्यामुळे इतर कामगंध व चिकट सापळ्यांच्या तुलनेत कमी खर्चात कीड नियंत्रण होते. 
  • अॅट्रॅप्स ऑल राऊंडर स्प्रे केलेल्या दिवसापासून 20 ते 30 दिवसांपर्यंत कार्यरत राहते.
  • अॅट्रॅप्स ऑल राऊंडरची एक बॉटल एक ते दीड एकर क्षेत्रासाठी उपयोगी पडते.

फायदे

  • 'अॅट्रॅप्स ऑल राऊंडर' हे तिहेरी फायदा देणारे उत्पादन आहे.
  • 'अॅट्रॅप्स ऑल राऊंडर' मधील पिवळ्या रंगामुळे इतर रसशोषक किडी देखील त्याकडे आकर्षित होतात.
  • 'अॅट्रॅप्स ऑल राऊंडर' मधील फेरोमोन(कामगंध) हा भाजीपाला पिकातील फळमाशी, काही प्रमाणात पांढरी माशी , काळा मावा, थ्रीप्स आणि रसशोषक किडींना आकर्षित करतो.
  • 'अॅट्रॅप्स ऑल राऊंडर ' हे पर्यावरण स्नेही उत्पादन आहे. प्लास्टिक प्रदूषण कमी होण्यास त्यामुळे मदत होते. याचे पॅकिंग देखील १००% पुनर्वापर करण्यायोग्य एल्यूमिनिअमने बनलेले आहे.

वापराचे प्रमाण

प्रति एकर एक बॉटल

'अॅट्रॅप्स ऑल राऊंडर' कसे वापरावे?

तीन स्टेप मध्ये याचा सोपा उपयोग आहे.
१. टाकाऊ रिकाम्या बाटल्या, कॅन, शीट यासारखी
वस्तू घ्या. त्यांना साफ करा.
२. बाटल्या, डबे किंवा शीटवर 'अॅट्रॅप्स ऑल राऊंडर' योग्य प्रकारे दोन वेळा स्प्रे करा.
३. ज्या उंचीवर फळे लागतात त्या उंचीवर स्प्रे केलेली वस्तू टांगा.

रचना

Attractant and Stabilizer - 60%

Propellant - 40%