वापराचे प्रमाण- 1 ते 2 किलो प्रति एकर 30 दिवसांच्या अंतराने
- फक्त ड्रीप किंवा आळवणी मधून वापरावे, फवारणी साठी वापरु नये.
- ज्या जमिनीचा pH नॉर्मल आहेत तिथे वर्षातून 12 किलो प्रति एकर सुपर ओरा वापरावे, व ज्या जमिनीचा pH जास्त अथवा अल्कलाईन आहे तिथे वर्षातून 14 ते 15 किलो प्रति एकर सुपर ओरा वापरावे.
प्रती एकर १ किलो ठिबक अथवा आळवणी द्वारे दर ३० दिवसांनी पिकांच्या वाढीच्या अवस्थेत द्यावे.
सुपर ओरा वापरताना घ्यावयाची काळजी
- सुपर ओरा पाण्यात टाकल्यानंतर १५ ते २० मि. प्लॅस्टिकच्या पाईपद्वारे एकजीव होई पर्यंत ढवळावे.
- मिश्रण कोमट अथवा गरम जाणवू लागल्यास हे मिश्रण तयार झाले असे समजावे.
- सुपर ओरा हे हळूवार पाण्यामध्ये सोडावे.
- पाणी सुपर ओराच्या बॉटल अथवा कॅनमध्ये ओतू नये.
- सुपर ओराच्या कॅन/ बॉटल चे झाकण वापर झाल्यानंतर लगेच बंद करावे अन्यथा त्याच्या शुद्धतेवर परिणाम होतो.
- सुपर ओरा कॅल्शियम असणार्या घटकांसोबत वापरू नये.
- अति उष्ण किंवा अतिथंड ठिकाणी ठेऊ नये.