Skip to product information
1 of 7

Nature Care Fertilizers

Krishi WMF | कृषी WMF

मररोगावर प्रभावी जैविक बुरशीनाशक | A biological fungicide effective against blight

वापरात असलेली वर्षे : 1

MRPRegular price Rs. 990.00   (incl. of all taxes)
Regular price Sale price Rs. 990.00
Sale Sold out
Tax included.
  • रु.४९९ वरील सर्व ऑर्डरवर मोफत शिपिंग




  • WMF हे उत्पादन वापरल्यास विविध पिकातील मर रोग उदा. डाळिंबातील मर रोग व डाय बॅक
  • हळद व आल्यातील कंदकूज, भाजीपाला पिकातील,ढबू -साधी मिरचीतील मर रोग इत्यादी... तसेच विविध पिकातील सूत्रकृमी यावर उत्तम कंट्रोल मिळतो.
  • पिकाच्या लागवड अवस्थेपासून याचा वापर करावा... जेणेकरून पुढे जाऊन रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही व रासायनिक औषधे वापरण्याची गरज भासणार नाही .


    Quantity
     : 3KG
View full details

Collapsible content

अतिरिक्त माहिती

शेती ही सूक्ष्मजीवांच्या मदतीनेच होतं असते. जर या सूक्ष्मजीवांचे मातीतील व्यवहार कसे चालतात ते शेतकऱ्याला माहिती असेल तर त्याचा आपण खुबीने शेतीत उपयोग करू शकतो. सूक्ष्मजीव हे बहुधा एकपशीय असतात. त्यांचे वर्गीकरण ही पुढील प्रमाणे असते.

1) बॅक्टएरिया 2)ऍक्टिनोमायसेट्स 3) बुरशी (फंगस ) 4) अलगी 5) प्रोटोझोआ 6)व्हायरस 7)सूत्रकृमी

शेतीसाठी फायदेशीर असणाऱ्या सूक्ष्मजीवांना सकारात्मक सूक्ष्मजीव असे म्हणतात तर शेतीमध्ये नुकसान करणाऱ्या सूक्ष्मजीवांना विकारात्मक सूक्ष्मजीव असे म्हणतात.

मागील दोन तीन दशकात, शेतीत रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आणि तुलनेने सेंद्रिय खतांचा वापर कमी झाला.तसेच बऱ्याच पिकांमध्ये पाटपाणी दिल्यामुळे देखील मातीत पाण्याचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त झाले.
या सर्वांचा परिणाम मातीतील उपयुक्त सूक्ष्मजिवाणूच्या वाढीवर झाला. मातीचे प्रामुख्याने,भौतिक, जैविक गुणधर्म आणि पर्यायाने रासायनिक गुणधर्म बिघडले. याचा परिणाम मातीच्या सुपीकतेवर झालाच पण त्यांचसोबत गेल्या काही वर्षात मातीतून येणाऱ्या रोग किडींचे प्रमाण वाढले आहे. यात प्रामुख्याने मर रोग आणि सूत्रकृमी चा अटॅक वेगवेगळ्या पिकात मोठ्या प्रमाणात वाढला आहे..मर रोग ज्या अपायकारक बुरशी किंवा जिवाणूमुळे येतो त्यामध्ये प्रामुख्याने फ्युजारीयम, पिथीयम, फायटोपथोरा, रायझोकटोनीया इत्यादीचा समावेश होतो...

यावर कंट्रोल मिळावायला, शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक औषधंचा वापर करतात. परंतु सुरुवातीपासून प्रतिबंधात्मक उपाय केले नसतील (preventive measures) तर पुढे जाऊन उपाय योजनाचे खर्च वाढतात, रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्याने पिकाचे मोठे नुकसान होऊन शेवटी लॉस होण्याची शक्यता जास्त असते. त्यांचसोबत,रासायनिक औषधंचा मातीत जास्त वापर केल्याने मित्रबुरशी, मित्रजिवाणूचा मोठ्या प्रमाणात नाश होतो व जमिनीची सुपीकता कमी होते..

मर रोग व सूत्रकृमी यांच्या नियंत्रणासाठी *WMF हे उत्पादन एकदम फायदेशीर आहे.

WMF हे उत्पादन वापरल्यास विविध पिकातील मर रोग (उदा. डाळिंबातील मर रोग व डाय बॅक, हळद व आल्यातील कंदकूज, भाजीपाला पिकातील,ढबू -साधी मिरचीतील मर रोग इत्यादी...) तसेच विविध पिकातील सूत्रकृमी यावर उत्तम कंट्रोल मिळतो..
पिकाच्या लागवड अवस्थेपासून याचा वापर करावा... जेणेकरून पुढे जाऊन रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही व रासायनिक औषधे वापरण्याची गरज भासणार नाही..

फायदे

  • कृषी-WMF हे विविध पिकातील मररोग, कंदकूज, डाय बॅक यावर अत्यंत प्रभावी आहे
  • कृषी-WMF हे पिकातील सूत्रकृमी, निमॅटोडयाचे प्रभावीपणे नियंत्रण करते.
  • रासायनिक ओषधांची गरज कमी लागते त्यामुळे शेतकर्‍याची आर्थिक बचतही होते.

वापराचे प्रमाण

वापरण्याचे प्रमाण - 3 किलो प्रति एकर

वापरण्याची पद्धत -

1) आळवणी किंवा ड्रीप (प्रति एकर साठी )
ज्या दिवशी वापरायचे आहे त्याच्या आदल्या दिवशी 20 लिटर पाणी + 3 किलो WMF + अर्धा लिटर दूध + अर्धा किलो गूळ असे मिश्रण तयार करून 3 - 4 वेळा व्यवस्थित ढवळून घ्यावे व दुसऱ्या दिवशी आवश्यक तेवढ्या पाण्यात मिक्स करून सकाळी लवकर किंवा सायंकाळी ऊन कमी असताना मुळंच्या भागात आळवणी करावी.

2) बेसल डोसमध्ये प्रति एकर 3 किलो WMF घेऊन ते ग्रीन हार्वेस्ट स्पेशल /ग्रीन हार्वेस्ट मध्ये मिक्स करून बेडवर किंवा लागवडीच्या ठिकाणी टाकावे..


टीप - ज्या दिवशी वापरणार त्याच्या अगोदर 5 ते 6 दिवस व नंतर 5 ते 6 दिवस कोणत्याही प्रकारचे रासायनिक बुरशीनाशक व सल्फर चा वापर करू नये.

रचना

CFU- Min 5×10^6 cells/gm