एस एस १० म्हणजेच पिकांच्या वाढीसाठी लागणाऱ्या १० अन्नद्रव्यांचा समुह होय. यामध्ये प्रमुख अन्नद्रव्य, नत्र, दुय्यम अन्नद्रव्ये, मॅग्नेशियम व सल्फर, सुक्ष्म अन्नद्रव्ये झिंक, फेरस, मंगनीज, कॉपर, बोरॉन, मॉलिब्डेनम व कोबाल्ट यांचा समावेश होतो. ही सर्व अन्नद्रव्ये संतुलित प्रमाणात मिसळून एस एस १० हे उत्पादन तयार केले आहे. साधारणपणे आपल्याकडे सुक्ष्म अन्नद्रव्ये ही EDTA किंवा EDDHA या चिलेटिंग एजंटचा वापर करुन बनविलेली असतात. परंतु एस एस १० मध्ये लिग्नोसल्फोनेट हा चिलेटिंग एजंट वापरला आहे. लिग्नोसल्फोनेट हा सेंद्रिय स्वरुपातील चिलेटिंग एजंट आहे. यामधील सुक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना लगेच उपलब्ध होतात. एस एस १० फवारणी केली असता यातील अन्नद्रव्ये २ ते ३ तासामध्ये पिकांना उपलब्ध होतात. तसेच यातील अन्नद्रव्ये इतर कोणत्याही मुलद्रव्यांबरोबर सहजासहजी संयोग पावत नाहीत. म्हणजेच ही सर्व अन्नद्रव्य पिकांना जवळपास १००% उपलब्ध होतात.