फळबागा व भाजीपाला पिकांमध्ये एक मोठी समस्या आढळते ती म्हणजे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव, यांमध्ये फळमाशी, पांढरी माशी, थ्रीप्स, माईट्स, अफाईड्स, जासिड्स यांसारख्या रसशोषक किडींचा समावेश होतो. या किडींमुळे शेतकरी बंधूचे मोठे नुकसान होते. यावर नियंत्रणासाठी शेतकरी बंधू मोठ्या प्रमाणावर किटक नाशकांचा उपयोग करतात. किटक नाशकांच्या वापरासाठी आर्थिक खर्च ही मोठा होतो. या सर्व गोष्टींचा विचार करता नेचर केअर फर्टिलायझर्सने स्टिकविन स्प्रे अॅट्रॅक्टंट हे उत्पादन बाजारामध्ये उपलब्ध करून दिले आहे.
स्टिकविन स्प्रे अॅट्रॅक्टंट हे सेंद्रिय उत्पादन असून पर्यावरणपूरक आहे. यामध्ये वरील किडींना आकर्षित करणारे अॅट्रॅक्टंट तसेच गम वापरला आहे. हे उत्पादन स्प्रे स्वरूपात दिल्यामुळे शेतक-यांना वापरायला सोपे आहे. आपल्या शेतातील उपलब्ध असलेल्या प्लास्टिक बॉटलवरती स्टिकविन स्प्रेचा फवारा दिला असता तो सापळ्यासारखे काम करतो व आपल्या पिकातील वरील किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात थांबवला जातो व आर्थिक नुकसान होत नाही.