सुपर एम हे एक जैविक उत्पादन असून यामध्ये इंडोमाइक्रोरायझा ही मित्रबुरशी दिली आहे. इंडोमायिकोरायझा ही बुरशी झाडाच्या विस्तारित वाढणाऱ्या मुळांसारखे काम करते व मुळांच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ वाढवते. सुपर एम च्या वापरामुळे पिकांच्या मुळांचा विस्तार मोठ्या प्रमाणात होतो, त्यामुळे पिकाला अधिक क्षेत्रातून पाणी व अन्नद्रव्य उपलब्ध होते. सुपर एम वनस्पतीच्या वाढीस उत्तेजन देते तसेच मुळांच्या विकासात वाढ करते. सुपर एम मधील मित्र बुरशी पिकांना अन्न, पाणी, पोषक द्रव्य पुरवतात तसेच रोगकारक बुरशींपासून पिकांचे संरक्षण करतात.