पिकांच्या वाढीसाठी १६ अन्नद्रव्यांची गरज असते. जवळपास ही सर्व अन्नद्रव्ये पिके जमिनीमधून शोषून घेतात. यामधील काही अन्नद्रव्ये ही पिकांकडून सहजरित्या शोषली जातात तर काही अन्नद्रव्ये ही स्थिर असल्यामुळे त्यांचे वहन पिकांमध्ये फार कमी प्रमाणात केले जाते. त्यामुळे पिकांमध्ये या अन्नद्रव्यांची कमतरता भासू लागते. यांमध्ये प्रामुख्याने कॅल्शियम व बोरॉन ही अन्नद्रव्ये येतात. कॅल्शियम व बोरॉन च्या कमतरतेमुळे पिकांमध्ये रोग व किडींचा प्रादुर्भाव जास्त वाढलेला दिसतो. यासाठी नेचर केअर फर्टिलायझर्सने फर्म राईट सी.एम.बी हे उत्पादन बाजारामध्ये आणले आहे. यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन व सेंद्रिय स्वरुपातील नायट्रोजन दिला आहे.